शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये रायगड हेल्थ सेंटरचे यश

। जेएनपीटी । वार्ताहर ।
औरंगाबाद येथे आयोजिलेल्या महाराट्र श्री स्पर्धेसाठी उरण तालुक्यातील रायगड हेल्थ सेंटर, कोप्रोली या व्यायामशाळेतून विविध गटात खेळण्यासाठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. सदरची स्पर्धा दि. 23 जानेवारी रोजी खेळली गेली असून त्यामध्ये महाराष्ट्र श्री साठी खेळलेल्या प्रांजळ पाटील (खोपटे) यांना सहभाग म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र उदय गटात अजित म्हात्रे (वशेणी) यांनी सुवर्ण पदक तर कुमार गटात संकेत वर्तक (गोवठणे) रजत पदक तसेच महाराष्ट्र श्रीमान पदकासाठी खेळलेल्या जितेंद्र पाटील (पाणदिवे) यांनी रजत पदक व पाणदिवे येथील विकास पाटील यांनी श्रीमान गटात वयाच्या 48 व्या वर्षी उत्तेजनार्थ पदक मिळवले. रायगड जिल्ह्यातून शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमच खेळणारे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा आयोजकांतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

Exit mobile version