राजिप शाळा कोंढरीच्या विद्यार्थीनींचे यश

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद शाळा कोंढरीच्या विद्यार्थीनी हेतल प्रवीण पांचाळ आणि तनिष्का चेतन पाटील या विद्यार्थीनींनी महाराष्ट्र राज्य इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत तसेच नुकत्याच पार पडलेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स आयोजित शालेय स्पर्धेत विशेष यश संपादन केले आहे. हेतल पांचाळ हिने पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत रायगड जिल्ह्यात विशेष प्रावीण्यसह 87 वा क्रमांक पटकावला. तसेच तनिष्का पाटील हिने शिष्यवृत्ती परिक्षेत विशेष यश संपादन करत रायगड जिल्ह्यात 171 वा क्रमांक पटकावला आहे. तरी या दोन्ही विद्यार्थीनींच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना कोंढरी शाळेचे म. का. म्हात्रे, प्रमिला गावंड, समता ठाकूर आदिंचे सहकार्य लाभले आहे.

Exit mobile version