स्काऊट गाईड स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्रदान
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील एम.एन. लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खांबचे ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब येथील पाच विद्यार्थ्यांनी भोर (पुणे) येथे झालेल्या स्काऊट गाईट राज्यपुरस्कार चाचणी परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून राज्य पुरस्कार प्राप्त केले. या यशाबद्दल पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
सन 2025-26 या वर्षाकरिता स्काऊट गाईट राज्य पुरस्कारासाठी ही स्पर्धा परीक्षा भोर (पुणे) येथे दि. 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी रायगड, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई येथील एकूण 142 स्काऊट परीक्षेला बसले होते. या स्पर्धेत तोंडी, प्रात्येक्षिक, लेखी अशा परीक्षेत एकूण 300 गुणांची परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघटन आयुक्त राठोड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सरिता डफल, वर्षा दळवी, गमरे, ज्ञानांकुर स्कूलचे संस्थापक स्काऊटर ऍड.रविंद्र लोखंडे, मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या स्काऊट गाईट राज्य पुरस्काराच्या परीक्षेत ज्ञानांकुर स्कूलचे चैतन्य चंद्रकांत चितळकर, कर्तव्य सुधीर लोखंड, युवराज राजेश चव्हाण, आदेश प्रदीप लाडगे, विघ्नेश घनश्याम नाकटे या पाच विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करून राज्य पुरस्कार प्राप्त केला. या यशाबद्दल स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापिका, स्कूल कमेटी सभासद, शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध स्तरावरून पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
