कपिल देवच्या प्रयत्नांना यश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अंशुमन गायकवाड यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. 71 वर्षीय गायकवाड यांच्यावर गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयला मदतीची विनंती करण्याव्यतिरिक्त कपिल देव यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी आपली पेन्शन दान करण्याचेही आश्वासन दिले होते. आता बीसीसीआयने कपिल देव यांच्या मागणीची दखल घेतली आहे. कपिल देव यांनी बीसीसीआयला आवाहन करताना म्हटले होते की, बीसीसीआयमध्ये अशी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून माजी क्रिकेटपटूंना अशा परिस्थितीत मदतीची गरज भासल्यास बोर्डाने त्यांना मदत करावी. क्रिकेटमध्ये आता जेवढे पैसे मिळत आहेत, त्यावेळी एवढे पैसे मिळत नव्हते. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटू महागडे उपचार घेण्याइतके आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत.

Exit mobile version