डेली बाजार येथील वाहतूक सिंग्नल सुरू
। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर हे झपाट्याने वाढत असलेले शहर असून सेक्टर-13 येथील हावरे डेली बाजार चौक हा रहदारीचा चौक म्हणून गणला जातो. यामुळे या ठिकाणी वाहतूक सिग्नलची व्यवस्था करण्यासाठी खारघरमधील शेकाप कार्यकर्ते जगदीश घरत आणि शहर महिला आघाडी प्रमुख तेजस्विनी घरत यांनी 9 स्पटेंबर रोजी पनवेल महानगरपालिका व ट्राफिक विभागाला लेखी अर्ज सादर केले होते. याच अनुषंगाने वाहतूक विभागाने या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला मोठे यश मिळाल्याचं बोलले जात आहे.
यावर विरोधक आपली पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून आलेे. मात्र, खारघरमधील सुज्ञ जनतेला आपली कामे कोण करते, हे माहित आहे. यावेळी शेकापचे जगदीश घरत यांनी सांगितले की, या कामासाठी आम्हाला आ. बाळाराम पाटील व पनवेल कृउबा समितीचे संचालक देवेंद्र मढवी यांनी मोलाचे सहकार्य केले. या उद्घाटन सोहळ्याला खारघर शेकाप नेते जगदिश घरत, तेजस्वी घरत, जीवन ठाकुर, अभय मोरे, गणेश पाटेकर, जीवन घरत, रुपेश घरत, आर.एस.हांडा, गणु घरत, भारती सावंत, सागर आडे, वंदना वेंगुर्लेकर, सेजल शर्मा आदी उपस्थित होते.