यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

| उरण | विठ्ठल ममताबादे |

एक गृहिणी ते एक यशस्वी व्यावसायिका म्हणून रोशनी गुरव ह्या गृहिणी आपले घर सांभाळताना, खूप संघर्ष करून टेलरिंग क्षेत्रात काम करून आपले नाव व्हावे, याकरिता काहीतरी नवीन करावे म्हणून नऊवारी साडीचे तीन ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मागील सात आठ वर्षापासून उरण शहरात बाजारपेठ मध्ये नऊवारी साडी शिवण्याचे काम करत आहेत, आज त्यांच्याच नावाने रोशनी नऊवारी साडी म्हणून त्यांचे दुकान उरणमध्ये प्रसिद्ध आहे. उरण शहरात नऊवारी साडी शिवण्याचे एकमेव दुकान असा त्यांचा प्रवास चालू आहे. आपले नाव करून एक यशस्वी गृहिणी ते एक यशस्वी व्यावसायिका म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे.आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत त्यांनी व्यवसायात उंच गगन भरारी घेतली आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, कार्यतत्पर, ग्राहकांना नम्रतेने बोलणे, वेळच्या वेळी सर्व कामे करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत. सर्वसामान्य गृहिणी ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. महिलांच्या गरजा ओळखून त्यांनी त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, महिलांना चांगली सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने व्यवसायात प्रवेश केला व त्या यशस्वी सुद्धा झाल्या आहेत. त्यांच्या या आदर्श व्यक्तिमत्त्वाची सर्व महिला प्रेरणा घेत आहेत. आदर्श घेत आहेत.
शब्दांकन – विठ्ठल ममताबादे, उरण

Exit mobile version