राबगाव गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील एकूण दोन निवडणूक विभाग व चार निर्वाचक गणाचा समावेश आहे. आज श्री बाळललेश्वर देवस्थानच्या भक्तनिवास एकमध्ये पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सुधागड प्रांत सायली ठाकूर, तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे, निवडणूक नायब तहसीलदार नकुल पोळेकर, निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे, महसूल सहाय्यक श्रीकांत इचके, पुरवठा निरीक्षक अधिकारी सुखदेव वाडणकर तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधि ओ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राबगाव गणाला अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यानंतर सोडत पद्धतीने नागरिकांचा महिला मागास प्रवर्गासाठी परळी गणाला दिला गेला. उर्वरित जांभूळपाडा आणि अडूळसे हे सर्वसाधारण म्हणून पुकारण्यात आले. 19 जांभूळपाडा गटातील 37 परळी व 38 जांभूळपाडा असे दोन गण असून, यामध्ये एकूण 14 ग्रामपंचायत चा समावेश असून 20 राबगाव गटातील 39 राबगाव व 40 अडूळसे असे दोन गण असून यामध्ये एकूण 19 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.







