सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांच्या एसएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात साने गुरूजी विद्यालय लोहारेतील सुधांशू कुमठेकर 94.80 टक्के गुणांनी सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलचा अथर्व दळवी याने 94 टक्के गुण, शंकरराव महाडीक इंग्लिश स्कूलची संस्कृती जाधव हिने 94 टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान प्राप्त केला आहे.

विद्यामंदिर पोलादपूरचा इयत्ता 10 वी मार्च 2026 निकाल वैशिष्ट्यपूर्ण असून, 94.49 टक्के निकालामध्ये 109 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी 22 विशेष प्राविण्य, 24 प्रथम श्रेणी, 39 द्वितीय श्रेणी, 18 पास श्रेणी असे एकूण 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तेजल किरण चव्हाण ही 93.40 टक्के गुण, राजवीर जाधव 91.40 टक्के गुण, सारा बुटाला 91.20 टक्के गुण मिळाले. श्री शिवकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला. तानाजी शेलारमामा प्रशाला उमरठ प्रशालेचा 100 टक्के निकाल लागला. माध्यमिक विद्यालय, सवाद येथे 100 टक्के निकाल, श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुकचा एकूण निकाल 98.41 टक्के, साने गुरुजी विद्यालय, लोहारेचा 100 टक्के निकाल लागला असून सुधांशू कुमठेकर 94.80 टक्के गुण मिळवून तालुक्यासह विद्यालयात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अथर्व अनिल दळवी 94 टक्के गुणांनी सर्वप्रथम आला.

Exit mobile version