| अलिबाग | वार्ताहर |
सिनेअभिनेता शाहरूख खान यांच्या मुलीची अलिबागमध्ये करोडो रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे माहिती समोर आली आहे. तब्बल साडेनऊ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. 78 हजार 361 स्क्वेअर फुटचा फ्लॅट खरेदी केली आहे. अलिबागच्या थळ गावात घेतलेली प्रॉपर्टी मांडवा जेट्टीपासून तेरा किलो मीटरच्या अंतरावर आहे. या जागेसाठी सुहाना खानने 57 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली असल्याची माहिती समोर येत आहे.







