सुहास खामकरचे चित्रपट सृष्टीत पदार्पण

। माथेरान । वार्ताहर ।

शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. खेळाचे क्षेत्र पादाक्रांत करून आता त्यांनी कलाक्षेत्रात म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले आहे. आता कलाक्षेत्र गाजवण्याचा त्यांचा मानस आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुहास यांनी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट देऊन छत्रपतींचे शुभाशीर्वाद घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. या हिंदी चित्रपटात सुहास खामकर यांची आय.पी.एस. पोलीस अधिकारी अशी भूमिका आहे. ड्रग्स तस्करीच्या विरोधात परदेशात जाऊन ते लढा देतात असे सर्वसाधारण कथानक या चित्रपटाचे आहे. हे चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक साकार राऊत, निर्माते पंकज राऊत तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजू चौधरी, कैलास नीचिते, श्रीकांत गायकर उपस्थित होते.

Exit mobile version