विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

। पालघर । प्रतिनिधी ।

गेल्या एक ते दोन महिन्यांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच मागील महिन्यात जव्हार प्रकल्पांतर्गत दोन आश्रम शाळांमध्ये एका विद्यार्थिनीने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. तर, दुसर्‍या शाळेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.1) रानशेत येथील आश्रम शाळेत 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाथरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास लावल्यामुळे तिचा जीव थोडक्यात बचावला आहे. सध्या तीच्यावर वलसाड येथे उपचार सुरू आहेत.

Exit mobile version