। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील आसरे येथील अनंत देवराम चव्हाण (46) यांनी शुक्रवारी (दि.5) मानसिक ताणतणावातून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत पाली पोलिसांना फिर्यादी नथुराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत चव्हाण हे गुरुवारी (दि.4) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची इको गाडी घेऊन घरातून निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी नथुराम चव्हाण घरी आले असता त्यांना अनंत चव्हाण यांची गाडी दिसली नाही म्हणून त्यांनी अनंत यांच्या पत्नीला फोन करून विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की अनंत यांचा फोन लागत नाही.
शुक्रवारी (ता.5) सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी नथुराम चव्हाण हे गावातील काही तरुणांना घेऊन आजूबाजूला शेती व झाडाझुडुपांमध्ये जाऊन शोध घेतला, त्यावेळी अनंता याचे ताब्यातील इको गाडी शेताच्या कडेला दिसली. 7.45 वाजता पायवाटेने खोपटीचा माल येथे पोहचल्यावर अनंता याने आईनाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.