। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे माळचीवाडी येथे राहणार्या 16 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तनवी रामचंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तन्वीची नजर कमी होती. तिला डोकेदुखीचा त्रास असल्याने रत्नागिरी येथे रुग्णालयात त्यांनी वर उपचार सुरु होते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्या पाटील करीत आहे.