विवाहितेची आत्महत्या; पती व सासू विरोधात गुन्हा दाखल

। सांगोला । वार्ताहर ।
सांगोला शहरातील कोष्टी गल्ली येथील ३४ वर्षीय विवाहितेला लग्नात मानपान न केल्याच्या व माहेरून पैसे का घेऊन येत नाहीस, या कारणावरून वारंवार शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पती व सासू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिनांक ७ ऑगस्ट राजगोपाल आवळकर रा. इचलकरंजी ता . हातकणंगले जि. कोल्हापूर यांनी प्रसाद हरीबा महादार, मिनाबाई हरीबा महादार दोघे रा. कोष्टी गल्ली सांगोला यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

महालक्ष्मी उर्फ गिता प्रसाद महादार (वय ३४) रा. कोष्टी गल्ली, सांगोला असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ,फिर्यादी यांची लहान बहीण महालक्ष्मी उर्फ गिता हिचा विवाह दिनांक २४ जून २००७ रोजी सांगोला येथील प्रसाद महादार याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झालेला होता. ती लग्नापासून तिच्या सासरीच राहणेस होती. तिला दोन मुले अथर्व व आदित्य असे आहेत. लग्नानंतर महालक्ष्मी उर्फ गिता हीस लग्नानंतर तिची सासु मिना हरीबा महादार व पती प्रसाद हरीबा महादार यांनी माहेरून पैसे घेऊन ये , म्हणून वारंवार जाच हाट करत होते. तसेच तिला माहेरच्या लोकांशी बोलू देत नव्हते.
दिनांक ७ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे इचलकरंजी येथे असताना त्याचे पाहुणे राजु पोटे यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फोन करून कळविले की, महालक्ष्मी उर्फ गिता हीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे, असे फिर्यादीत सांगितले आहे.

Exit mobile version