महिला पोलिसाची आत्महत्या

| पनवेल | वार्ताहर |

कौटुंबिक वादातून एका महिला पोलीस कर्मचार्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेलमध्ये असलेल्या मॅरेथॉन सोसायटीमध्ये राहणार्‍या स्नेहा खोत (26) या महिला पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कौटुंबिक वादातून राहत्या घरातील बेडरुमच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version