निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात सातत्यानं शेतकर्‍यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या 60 दिवसांच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकर्‍यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारे शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत, अशी मागणी किसान सभेनं केली आहे.

Exit mobile version