आरसीएफ कॅन्टीन कर्मचार्‍याची आत्महत्या

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरसीएफ कॉलनीतील कॅन्टीन कर्मचार्‍याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जयंत हरण देबनाथ वय 34 वर्षे रा. बी 21 रुम नं 2, आरसीएफ कॉलनी, कुरुळ असे या तरुणाचे नाव आहे. तो आरसीएफ कॅन्टीनमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यतर होता. नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता कॅन्टीनचे इतर कामगार कामावर आले असता पंख्याला लटकलेल्या अवस्थेत जयंत देबनाथ याचा मृतदेह आढळला. त्यामुळे ताबडतोब अलिबाग पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी हजर होत. त्याला खाली उतरविले. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात त्याला हलविले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानुसार जयंत देबनाथ याचा उरण येथे असलेल्या भाऊ उत्पल देबनाथ याला कळविण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अधिक तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

Exit mobile version