दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुजल गट्टे, युग सोनी विजेते

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा बॅडमिंटन क्लब तर्फे म्हसळा क्रिडा संकुल येथे आयोजित केलेल्या 17 वर्षांखालील मुलांच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी प्रथम तर म्हसळा येथील युसुफ आणि अझेन यांनि द्वितीय क्रमांक तसेच रोहा येथील निहार आणि मुसीफ यांनी तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्यांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच आकर्षक चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले.

अशा प्रकारच्या 17 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा म्हसळा येथे प्रथमच आयोजीत केल्या होत्या. त्यासाठी म्हसळा बॅडमिंटन क्लबचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातून म्हसळा श्रीर्वधन माणगांव रोहा अलिबाग येथील एकूण 32 टीमने सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इम्रान कादरी, मोहीत मेहता, यतिन करडे, सलमान पठाण, साद काझी, अबीद, झोहेब, ज्योती ढापले व टिप टॉप ग्रुप श्रीवर्धन यांनी विशेष सहभाग घेतला होता.

Exit mobile version