। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील सुंदरीबाई बाळाजी कवाडे (94) यांचे बुधवारी (दि.18) वृध्दापकाळाने निधन झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते दिनेश कवाडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दांडगुरी येथील स्मशानभूमीत गुरुवारी (दि.12) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नातेवाईक ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे कवाडे कुटूंबियात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुंदरीबाई कवाडे यांची शोकसभा व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम रविवारी (दि.22) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दांडगूरी येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कवाडे कुटुंबियांनी दिली आहे.







