सुनीता दगडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

सहा ग्रामपंचायतीत नऊ सदस्य बिनविरोध

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायत मधील रिक्त असलेल्या 11 सदस्य पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. तर तिवरे ग्रुप ग्रामपंचायतमधील थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत तिवरे ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच म्हणून सुनीता हरिचंद्र दगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर तालुक्यात सहा ग्रामपंचायत मधील नऊ सदस्य हे पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडले गेले आहेत.

तालुक्यातील आठ ग्रामपंचायत मधील 11 सदस्य यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या आठ ग्रामपंचायत मधील केवळ एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून साळोखतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये तेथील एका जागेसाठी 18 मे रोजी तीन उमेदवार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तर हुमगाव मधील अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी कोणत्याही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही आणि त्यामुळे त्या जागेची पोटनिवडणूक स्थगित झाली आहे.

सावेळे ग्रुपग्रामपंचायतमधील रिक्त असलेल्या प्रभाग पाच मधील अनुसूचित जाती राखीव जागेवर शरद सदानंद जाधव हे तर त्याच प्रभागातील नागरिकांनाच मागासप्रवर्ग महिला राखीव या जागेवर अपूर्वा किसन जोगळे या बिनविरोध निवडणूक आल्या आहेत. भिवपुरी ग्रामपंचायतमधील प्रभाग एक मधील रिक्त असलेल्या सर्वसाधारण जागेवर सागर प्रदीप गायकवाड हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पोटल ग्रुपग्रामपंचायत मधील रिक्त असलेल्या प्रभाग एक मधील महिला सर्वसाधारण जागेवर प्रमिला प्रकाश आगज या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पाषाणे ग्रुपग्रामपंचायत मधील रिक्त असलेल्या प्रभाग दोन मधील सर्वसाधारण जागेवर चंद्रकांत तुकाराम धुळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. माणगाव तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायत मध्ये रिक्त असलेल्या प्रभाग चार मधील सर्वसाधारण जागेवर संगीत पंढरीनाथ कराळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

तर वाकस ग्रुप ग्रामपंचायत मधील तीन सदसय यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या सर्व रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यातील प्रभाग एक मधील सर्वसाधारण जागाईवर प्रिया बबन भागीत या तर प्रभाग दोन मधील नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव जागेवर प्रिया हरेश सोनावळे या आणि प्रभाग तीन मधील सर्वसाधारण जागेवर रवींद्र देहू खांबाळे हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

Exit mobile version