| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील चिंध्रण गाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना चिंध्रण व ग्रामस्थ मंडळ चिंध्रण यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण विस्तार व मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या बेकायदेशीर व अवैध टॉवरविरोधात गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे पनवेल चे तहसीलदार विजय पाटील व इतर संबंधित शासकीय अधिकारी यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून तातडीने या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.