| पनवेल | वार्ताहर |
पावणे दहा लाखांचा भंगार मालाने भरलेल्या ट्रकचा अपहार झाल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल परिसरात भंगार खरेदी विक्री करणारे अजीम मुल्ला अलीवारी शेख यांना आरोपी मुजूने फोनद्वारे संपर्क साधून तुमच्याकडे भंगार माल विक्रीसाठी आहे का याबाबत विचारणा केली. त्यानुसार आरोपीने त्यांच्या पनवेल येथील के.जी. एन. ट्रेड्स या दुकानात ट्रक पाठवून त्याठिकाणावरून 23.940 टन वजनाचा भंगार माल भरल्यानंतर कंपनीमध्ये न पाठवता मालाचा अपहार केला आहे.