। उरण । प्रतिनिधी ।
सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उध्वस्त होवू नये यासाठी प्रीतम म्हात्रे यांनी जे.एम. म्हात्रे ट्रस्टच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणींना विमानातील नोकर्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण झाले असून प्रीतम म्हात्रे यांच्या पाठीशी एकवटली आहे. या तरूण वर्गाने विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उरण तालुक्याचा दौरा केला. यावेळी तरूणाईने एकच जल्लोष करून प्रीतम म्हात्रे यांच्या अभूतपुर्व कार्याची पोहोचपावती दिली आहे.
यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, नारायण घरत, पाडूमामा घरत, अनिल ढवले, रमाकांत घरत, जितेंद्र घरत, सचिन ताटफले व माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.