। मुंबई । वृतसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अनिवार्य असलेली NEET PG परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्च रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET PG) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सहा MBBS विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर मोठा निर्णय जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती डी.वाय. यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि सूर्यकांत यांनी यासंबंधी सुनावणीला सुरुवात केली. यापूर्वी 7 फेब्रुवारीला सुनावणी होती. मात्र ती आधीच घेण्यात आली. यासंबंधी 25 जानेवारीला याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर संबंधित परीक्षा 6 ते 8 ते आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.mu
सुप्रीम कोर्टाने NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या
