। नवी दिल्ली । प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरल्या वेळेत होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असलं तरी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचे प्रकरण हे तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं भविष्यात या उमेदावारांवर टांगती तलवार असणार आहे. आज (दि.28) सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं होऊ घातलेल्या नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांवर स्थगिती आणण्यास नकार दिला. आता या प्रकरणी २१ जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे.







