| पुणे | प्रतिनिधी |
खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर किरकोळ अपघात झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. तसेच, ज्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली त्या वाहनाची नंबर प्लेटही सुप्रिया सुळेंनी शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर जीजे-13-सीएफ-5257 या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिली. हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे की, आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित राहतील.
सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात
