पतपेढीच्या चेअरमनपदी सुरेश बिनविरोध

| खांब | वार्ताहर |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सह. पतपेढी मर्या., ता. रोहा या पतपेढीच्या चेअरमनपदी रा.ग. पोटफोडे (मास्तर) खांब या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश गणपत जंगम यांची दुसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पतपेढीच्या संपन्न झालेल्या महत्त्वाच्या सभेमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. तर, सहाय्यक दुय्यम निबंधक रोहा येथील राखी गावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या या निवड प्रक्रियेत उपाध्यक्ष म्हणून बाळू गाडे, तर म्हणून सचिव प्रकाश शिंदे, सहसचिव प्रवीण मरवडे, खजिनदार नरेश महाडिक, सदस्य नितीन गोरिवले, मुरलीधर कोंजे, देवळेकर, सौ. सावरकर, संजीव शेरमकर, राजेश वाघमारे, रवींद्र ठाकूर, सुनील थिटे, शशिकांत महाडिक आदींची सन 2024 ते 2029 या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. चेअरमनपदी निवड करण्यात आलेले नवनिर्वाचित चेअरमन सुरेश जंगम व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीतांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version