सुरेशभाऊ लाड चषक 2022 स्पर्धेा सुरु

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी माजी आ. सुरेश भाऊ लाड चषक 2022 चे क्रिकेट स्पर्धेचे सामन्यांचे आयोजन केले आहे. कर्जतमधील 48 संघांनी सहभाग घेतला असून असे पाच दिवस नाईट ओव्हर आर्मचे सामने ठेवले आहे.या उदघाटन माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शरद लाड, भगवान चंचे, अतुल चंचे यांच्या हस्ते करण्यात आले होते. माजी आ. सुरेश लाड यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड संतोष बैलमारे,भाई गायकर, मोहन ओसवाल, सागर शेळके आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी माजी आ. लाड यांनी आपल्या मनोगतात कोरोना काळात अनेक खेळाडूंना मन मारून घरी बसावे लागले होते आणि अमोघ कुळकर्णी यांनी खेळाडूंना मैदान खुले करून त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कौतुक केले.

Exit mobile version