मार्गावरील झुडपे कापून मार्ग केला मोकळा
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुख्य पावसाचा जोर ओसरला, तसेच परतीचा पाऊस आपल्या वाटेवर असताना सुरगडाच्या शिलेदारांना वेध लागले ते दसरा गडपुजनासाठी किल्ले सुरगडाच्या स्वच्छतेचे. त्यामुळे गडावर जाणारा मार्ग व त्यालगत वाढलेली काटेरी झुडपे आणि गवत, तर पावसात काही आलेले दगड गोटे स्वच्छ करण्यासाठी पुन्हा स्थनिक सुरगडाचे शिलेदारानी आपल्या गड संवर्धन मोहिमेला रविवारी दि.8 रोजी पुन्हा प्रारंभ करत गडाकडे मार्गक्रमण केले.
गडावर पावसाळ्यापूर्वी या शिलेदारांकडून 22 मोहीम राबविण्यात आलेल्या होत्या. या मोहीमेअंतर्गत गडावरील स्वच्छ्ता तसेच संवर्धन करत गडावरील सहा पाण्याच्या टाके साफ करण्यात आल्या होत्या. स्वच्छ्ता व संवर्धनात काही शिवकालीन सापडलेल्या पुरातन तोफ व शिवकालीन शीळा यांचे पावसाळ्याआधी सुरक्षित जागेत संवर्धन करण्यात आले होते. तसेच गडावर हनुमान मंदिर, शिवकालीन मंदिर, रहाळ परिसरात स्थानिक सुरगाडाचे शिलेदार आणि सामजिक वनविभाग रोहा, लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने वेगवेगळ्या झाडांची लागवड तसेच रंगी बेरंगी फुलांची लागवड करण्यात आली होती.
सदरच्या 23व्या मोहिमेत तब्बल 27 सुरगडाच्या शिलेदारांनी सहभाग घेत सुरगडाकडे रविवारी सकाळी 7 वा. प्रस्थान करून गडाच्या प्रारंभापासून गडावरील महादरवाजा परीसर, हनुमान मंदीर परीसर त्याचबरोबर शिवमंदीर परीसराजवळील वाढलेली काटेरी झूडपे, गवत साफ करण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण बुरूजाकडे असलेल्या ध्वजस्तंभाकडे जाण्याचा मार्गावरील वाढलेलं गवत स्वच्छ्ता व साफ करत मार्गावर पावसात आलेले दगड गोटे यांचे तसेच पावसाळ्यात केलेल्या वृक्ष रोपन तसेच विविध केलेल्या फुलांची लागवड यांचे देखील यावेळी संगोपन व संवर्धन करण्यात आले.
मोहिमेत सहभागी झालेल्या सुरगडाच्या शिलेदारांचा जोश पाहता येणारा दसरा गडपुजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार हे नक्की. या मोहिमेमधे सहभागी सर्व सुरगडाच्या शिलेदारांचे संस्थापक अध्यक्ष अजय भोसले यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले.







