। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यात भट नर्सिंग होमच्या माध्यमातून मागील आठवड्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रोहा तालुक्यातील रुग्णांना पंचतारांकित रुग्णालयात उपलब्ध होणार्या वैद्यकीय सुविधा रोहा शहरात मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
हायटस हर्निया या जटिल आजारात जिथे जठराचा काही भाग डायफाग्रॅम नावाच्या स्नायूंच्या पडद्यातून छातीत जातो. रुग्णाला सात ते आठ वर्षांपासून अॅॅसिडीटी व अन्नसारखे घशाशी येण्याचा त्रास होता. त्यासाठी गेली 8-10 वर्षे संबंधित रुग्ण अॅसिडिटीच्या गोळ्या खात होते. या रुग्णाचे एंडोस्कोपिने निदान झाल्यानंतर डॉ. अपूर्व भट यांनी त्यांच्या पुण्यातील मित्रास मदतीला बोलावले होते. र्ढेीशिींफी र्ऋीपवेश्रिळलरींळेप नावाची एक अवघड आणि जटिल शस्त्रक्रिया केली. ती यशस्वीपणे करण्यात आली.
थायरॉईड शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपिने थायरॉईड शस्त्रक्रिया, डाव्या स्तनाच्या कर्करोगासाठी मॉडिफाइड रॅडिकल मास्टेक्टॉमी करून कर्करोगाची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णास डाव्या स्तनाचा कर्करोग झाला होता. ऑपरेशन करून ती पूर्ण गाठ काढण्यात आली. पुढे लागणारी केमोथेरपीसुद्धा हॉस्पिटलमध्येच देण्यात येणार आहे. सर्व रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पटकन बरे झाले. स्वतःचे अत्याधुनिक ऍनेस्थेसिया वर्कस्टेशन (मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्ण भूल द्यावी लागते. त्यासाठी लागणारे यंत्र) आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले असून, डॉ. तुषार राजपूत (भूलतज्ज्ञ) हे कायमचे पुण्यातून रोह्यात स्थायिक झाले आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी नवीन दालन उपलब्ध झाले आहे.