महाड एसटी आगारातील स्वच्छतेचे सर्व्हेक्षण

| महाड | प्रतिनिधी |

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांचे सर्व्हेक्षण करून त्यांचे मानांकन केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील आगाराची स्वच्छता आणि त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांचे पथक महाड एसटी आगारात रविवारी दाखल झाले होते.

सदर पथकामध्ये रत्नागिरी जिल्हयाचे विभागीय नियंत्रक बोरसे, लेखाधिकारी चौगुले आणि उपयंत्र अभियंता जाधव यांचा समावेश होता. आगाराची स्वच्छता, शौचालयांची अवस्था, परिसराची स्वच्छता, आगारातील वाहनांची दुरुस्ती व स्वच्छता, रंगरंगोटी, फलाट व्यवस्था आदीची पाहणी करून त्याबाबत गुणांकन करण्यात आले. यावेळी महाड एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी उपस्थितांना कामकाजाची माहिती दिली.

Exit mobile version