सूर्यवंशीने मोडला षटकारांचा विश्वविक्रम


| सिडनी | वृत्तसंस्था |

युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने बुधवारी ऑस्ट्रेलियात 70 धावांची धमाकेदार खेळी साकारताना यू-19 विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंदचा 38 षटकारांचा विक्रम मोडला. वैभवने यूथ वन-डेमध्ये सर्वाधिक 41 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. दुसऱ्या वन-डे भारत ‘अ’ संघासाठी खेळताना त्याने 70 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 6 षटकार फटकावले. वैभव सूर्यवंशीने यूथ वन-डेमध्ये उन्मुक्त चंदचा विक्रम मोडला. आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत. सर्वाधिक यूथ वन-डे षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता सर्वात पुढे पोहोचला आहे. त्याने माजी भारतीय यू-19 वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार उन्मुक्त चंदच्या 38 षटकारांचा विक्रम मोडला. सूर्यवंशी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वन-डे मालिका खेळत आहे. सूर्यवंशीने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकताना 68 चेंडूंमध्ये 70 धावा फटकावल्या. उन्मुक्त चंदने 21 सामने खेळून 38 षटकार मारले होते, तर सूर्यवंशीने हा टप्पा केवळ 10 डावांमध्ये गाठला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 70 धावांच्या खेळीत त्याने सहा षटकार मारले. त्यानंतर कर्णधार यश देशमुखने आर्यनच्या शानदार झेलमुळे त्याला बाद केले. सूर्यवंशीने युवा वन-डेमध्ये 540 धावा केल्या असून, त्यापैकी 26 धावा (41 षटकारांसह) बाऊंड्रीद्वारे आल्या आहेत. भारतीयांमध्ये सूर्यवंशी आणि चंद नंतर यशस्वी जैस्वाल तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने 2018 ते 2020 दरम्यान 27 सामन्यांमध्ये 30 षटकार मारले आहेत.

Exit mobile version