दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुशांत फळसणकर, शुभम पाटील विजेते

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
केंद्रीय विहार खारघर येथे दिनांक 8 जानेवारी रोजी खारघर केरला समाज व रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग येथील क्रिडा भुवन चे खेळाडू सुशांत फळसणकर व शुभम पाटील यांनी अंतिम फेरीत सीबीडी बेलापूर येथील रोहन सोनावणे व संदीप राजगे यांच्यावर 21-16, 21-12. असा सरळ विजय मिळवला. सदर स्पर्धेमध्ये रायगड व नवी मुंबई येथील एकूण 64 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख रक्कम,चषक, मेडल, व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version