घरफोडी करण्याच्या प्रयत्नात लपलेल्या संशयित आरोपीला अटक

पोयनाड पोलिसांची कारवाई

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 ऑगस्ट रोजी 00:45 वा च्या सुमारास मौजे पेण अलिबाग रोडवरील पोयनाड एस.टी.स्टॅन्डच्या बाजुला असणा-या नवनाथ रसवंती गृहाच्या गाळ्याच्या बाजुला भिंतीच्या आडोश्याला घरफोडी चोरी सारख्या उद्देशाने लपून बसलेल्या आरोपीला पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या पनवेल रेल्व स्टेशन येथे राहणाऱ्या या आरोपीचे मूळ गाव बरजन पुर, ता.देपालपुर, जि.इंदौर राज्य मध्य प्रदेश असे आहे. तो आपल्या ताब्यात लोखंडी शीग,स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य बाळगुन सुर्यास्त ते सुर्योदयाच्या दरम्यान अंधारात लपुन घरफोडी, चोरी सारखा गुन्हा करण्याच्या हेतुने आपले अस्तित्व लपवुन बसलेल्या स्थितीत आढळून आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 17/08/2021 रोजी 04:09 वा सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोयनाड ठाणे येथे गु.र.नं.72/2021, मुंबई पोलीस अधिनियम,1951,मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार माने हे करीत आहेत.

Exit mobile version