मुंब्र्यातील संशयित एटीएसकडून ताब्यात

ठाणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकान ठाणे जवळील मुंब्रा येथून एका संशयित आरोपीला अटक केली. रिझवान असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखच्या चौकशीत रिझवानचे नाव समोर आले. यानंतर एटीएस पथकाने मुंब्रा येथून रिझवान यास ताब्यात घेतले आहे.  मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. यावेळी दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांसह सहा संशयितांना अटक करण्यात आली होती.

Exit mobile version