अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील धोत्रेवाडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचे प्रेत संशयास्पदरित्या आढळून आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ही आत्महत्या की खून याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धोत्रेवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाबाहेर 500 मीटर अंतरावर झाडाखाली आढळून आला होता. सोमवारी (दि.18) सायंकाळी पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कर्जत पोलिसांनी पंचनामा करून कशेळे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन ठेवला.झाडाला ओढणी बांधून त्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी असून मृतदेह खाली जमिनीवर पडला असल्याने पोलिसांना ही आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत कर्जत पोलिसांनी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र त्या तरुणीची आत्महत्या नसून खून झाला आहे अशी चर्चा परिसरात आहे. त्यामुळे त्या दृष्टीने कर्जत पोलीस तपास करीत आहेत

Exit mobile version