| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील परहूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात एका 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी घडली असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश चंद्रकांत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला दारु पिण्याचे व्यसन होते. काही दिवसांपुर्वी त्याला परहूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. राकेश जाधव याला बांधून ठेवले होते. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. नशा मुक्ती केंद्रातील मृत्यूबाबत जाब विचारण्यात आला आहे. या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताच्या नातेवाईकांनी देखील नशा मुक्ती केंद्रातील कारभाराविरोधात तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
De-addiction Centre: व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
