| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकच्या पेठ तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, महिलेच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा भिवसन या महिलेला जखमी अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. ही लाकूड आणण्यासाठी घराबाहेर गेली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने घातपात आहे की अपघात याविषयी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.