गॅस प्रकल्पाजवळ संशयास्पद रिक्षा

| उरण । वार्ताहर ।

भेंडखळ, बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर गेली अनेक दिवसांपासून संशयास्पद रिक्षा उभी असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तरी पोलीस यंत्रणेने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून संशयास्पद उभ्या असलेल्या रिक्षाचा ताबा घ्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

तालुक्यातील भेंडखळ व बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत केंद्र व राज्य सरकारचा भारत गॅस व वायु विद्युत वितरण कंपनीचा महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पश्‍चिम दिशेकडील रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करुन नयेत, अशा प्रकारची सुचना दर्शविणारे फलक सिडकोकडून लावण्यात आले आहेत. परंतु सदर रस्त्यावर गेली अनेक दिवसांपासून संशयास्पद रिक्षा उभी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे सदर संशयास्पद रिक्षाचे गौडबंगाल काय आहे. अशा प्रकारची चर्चा गेली अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात जनमाणसात वर्तविण्यात येत आहे. तरी पोलीस यंत्रणेने सदर संशयास्पद रिक्षाचे गौडबंगाल काय आहे. याचा तपास करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version