सुतारवाडी धरण शेतकर्‍यांना वरदान

उन्हाळी शेतीसाठी मुबलक पाणी
तीन ग्रामपंचायतींची भागवतेय तहान

सुतारवाडी | वार्ताहर |
सुतारवाडी धरण ग्रामस्थांसह येथील शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. रायगडात काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने सद्यःस्थितीत हे धरण तुडुंब भरले आहे. सुतारवाडी धरणाच्या पाण्यावर उन्हाळी येथील स्थानिकांसह पेण, अलिबाग, पनवेल येथील शेतकरी कलिंगड तसेच विविध प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर लावून उत्पादन घेत असतात.

सुतारवाडी येथे लघु पाटबंधारा योजनेंतर्गत 1977 साली धरण पूर्ण बांधून तयार झाले. या धरणाची लांबी 325 मीटर असून धरणाची उंची 16.39 मीटर एवढी आहे. धरणामध्ये एकूण पाणीसाठा 2.320 दशलक्ष घनमीटर एवढा असून उपयुक्त पाणीसाठा 2.264 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्याचप्रमाणे या धरणामध्ये निरूपयोगी पाणीसाठा 0.056 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 9.84 चौरस किलोमीटर आहे. तर भूसंपादन क्षेत्र 58.20 हेक्टर एवढे आहे. या धरणातील पाण्याची साठा पातळी 93.35 एवढी आहे. जोरदार पाऊस झाला तर पाण्याची पातळी 934.528 क्युसेस एवढी असते.

सुतारवाडी धरणाचा अवाढव्य परिसर आणि निसर्गरम्य परिसर असल्यामुळे तसेच आजूबाजूला अनेक प्रकारची हिरवी झाडे आणि फार्म हाऊस असल्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील निसर्गाचे सौंदर्य आणि संथ वाहणारे पाणी पाहण्यासाठी हौसी पर्यटक येत असतात. हौसी पर्यटकां बरोबर मद्यपी सुद्धा येतात. त्या मुळे या परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच असतो परिसर अस्वच्छ होतो. मात्र येथील इनचार्ज श्री. संदेश गोपाळ बिरवाडकर आणि त्यांचे सहकारी श्री. शिवाजी पांडुरंग सावंत हे जातीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ राखतात. या सुतारवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.

Exit mobile version