। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुवर्णा प्रसाद पत्की यांची नियुक्ती झाली आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि.26) त्यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग येथे झाली असून त्यांना पनवेल विभागाचा कार्यभार दिला आहे.
अलिबाग सायबर विभागात असलेल्या सुवर्णा पत्की यांची कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी वर्णी लागली आहे. त्यांची पोलीस दलात 32 वर्ष सेवा झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी आदी मोठ्या शहरातील पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले आहे.
प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पोलिसांवर नागरिकांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांच्या सहकार्याने कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कशी राहिल, यासाठी करणार असून सायबर क्राईम बाबत विशेष जागृती अभियान राबवणार असल्याचे त्यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.