महाडिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

ग्रीष्मा भुवड शाळेत पहिली
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर येथील शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग सातव्या वर्षीसुद्धा 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून, ग्रीष्मा अमोल भुवड हिने 86 टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत शाळेचे संचालक शंकरराव महाडिक, अध्यक्षा मंगला महाडिक, उपाध्यक्ष बाबुराव महाडिक, मनोज महाडिक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा उतेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Exit mobile version