| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिष्यवृत्ती परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यामध्ये एकूण 23 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये 11 विद्यार्थिनींचा आणि 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मराठी माध्यम पाचवीतील श्लोक मोर, वेद काळे, पल्लरी नाईक,सिद्धेश यादव,यज्ञेश पेढवी.इंग्रजी माध्यमातील अनुज यादव, दिव्या स्थेलेकर, शिवराज राठोड, अक्षरा वानखेडे, दुर्वाक्षी कुथे, आर्या कुंटे, देशना ओसवाल, रुद्र कडवे आणि देवश्री टेमकर यांना शिष्यवृत्ती मिळाली. मराठी माध्यमाच्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मयुरेश पाटील आणि वेदश्रुती मराठे तर इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेत शुभम घरत, स्वरा पाटील, शिवम झा,अथर्व पाटील, परिणिता कांबळे, रिद्धी पाटील आणि सतेज पाटील यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.