स्वामिनी प्रतिष्ठानने महिलांना स्वावलंबी बनविलेः अनुप दुरे

| खोपोली | प्रतिनिधी |

स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गटातील महिला वर्गाने आपला आर्थिक विकास साधावा. त्यामुळे आपल्या कुटुंबाला हातभार लागेल, असे प्रतिपादन खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी केले.

बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दिवाळी फराळ व गृहपयोगी वस्तूचे विक्री व प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी दूरे बोलत होते. स्वामिनी प्रतिष्ठानतर्फे समाज मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या बचत गटाच्या विक्री व प्रदर्शनात खालापूर तालुक्यातील 25 बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदविला. या स्टॉलमध्ये दिवाळीचा फराळ त्याचप्रमाणे गृहपयोगी जीवनावश्यक वस्तू, सजावटीच्या वस्तू, साडी व इतर वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी खोपोलीकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येन भेट दिली.

महिलांनि स्वावलंबी बनावे, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, छोट्या छोट्या उद्योगातून महिलांनी शासनाच्या व बँकांच्या माध्यमातून मोठ्या उद्योगाकडे वळावे, हा स्वामीनि प्रतिष्ठानचा हेतू असल्याचे अध्यक्ष कांचन जाधव यांनी सांगितले. केवळ प्रदर्शन न भरविता त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत तसेच बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी कशाप्रकारे कागदपत्रकांची पूर्तता करता येईल, याची माहिती प्रतिष्ठानतर्फे दिली जाते. बचत गटाच्या माध्यमातून महिला आपला आर्थिक विकास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी या स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाडकर, राजू गायकवाड, हरेश काळे, तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version