स्वरा शेटगेचे स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल येथील महात्मा स्कुल ऑफ अकॅडमी अँड स्पोर्ट्स येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या स्वरा संदीप शेटगे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश पटकाविले आहे. रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने रायगड जिल्हा रोलर स्केटिंग खुली स्पर्धा 2023-24 ही खोपोली येथे भरविण्यात आली होती. यामध्येस्वरा संदीप शेटगे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय व रिंकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकाविले आहे. या तिच्या भरघोस कामगिरीमुळे तिची रायगडतर्फे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिचे कोच शिवांग यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या तिच्या यशाबद्दल तिचे शाळेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version