| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. उतेखोल या नामांकित पतसंस्थेच्या सभासदांची यावर्षीही दिवाळी गोड होणार आहे. दरवर्षी या पतसंस्थेचा वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा मान्यवर व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवाय ही पतसंस्था संकटग्रस्त व पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता अग्रेसर असते. या संस्थेने आपल्या प्रगतीचे आणखी एक यशस्वी पाऊल टाकताना संस्थेची इंदापूर शाखा सुरु केली आहे. या पतसंस्थेतर्फे रौप्य महोत्सवी वर्षापासून संस्थेतील सभासदांची दरवर्षी दिवाळी गोड व्हावी हा उद्देश नजरेसमोर ठेऊन भेटवस्तू देण्याचा मानस केला आहे. यावर्षीही या संस्थेच्या सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. संस्थेच्या सभासदांनी पतसंस्थेच्या कार्यालयात दि.10 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत आपली भेटवस्तू स्वीकारावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक ॲड. राजीव साबळे, अध्यक्ष आनंद यादव, उपाध्यक्ष मदनलाल जैन, संचालक नरेश राजपूत, नंदलाल दोशी, उदय म्हशेळकर, शांतीलाल जैन, दिलीप जाधव, दिलीप अंबुर्ले, अरुण प्रभाळे, संदिप खरंगटे, किर्ती पुराणिक, दीप्ती मोरे यांच्यासह व्यवस्थापक, कर्मचारी वृंद व स्वल्पबचत प्रतिनिधी यांनी केले आहे.







