आठवड्याभरातील तिसरी घटना
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगाद्या जवळ पुण्याकडे जाणार्या स्विफ्ट डिझाईर कारला अचानक आग लागल्याची घटना दुपारच्या वेळेत घडली असून कारमधील पाच प्रवाश्यांसह चिमुकलं बाळ सुखरूप बचावले आहे.तर आठवड्याभरात वाहनांना आग लागण्याची तिसरी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार एक्सप्रेसवेवरून स्विफ्ट कार नंबर चक-01- ऊद-1348 पुण्याच्या दिशेने जाताना 40/600 किमी आडोशी बोगाद्या जवळ कारने अचानक पेट घेतला.कार मधील प्रवाश्यांनी सतर्कता बाळगत लहान चिमुकल्यासह कारमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.सदर आग शॉर्ट सर्किट मुळे पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.घटनास्थळी आय.आर.बी,पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेने आग आटोक्यात आणली तर महामार्ग पोलिस, डेल्टा फोर्स आणि मृत्युंजय देवदूतच्या सदस्यांनी यावेळी सहकार्य केले.बोरघाटात एशयर टँम्पो आणि दि.27 मे रोजी निशान टेरोने नंतर स्विफ्ट डिझायरला आग लागल्याची तीन आठवड्यात घडल्यामुळे एक्सप्रेसवेवरी वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.