। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अँथमची घोषणा केली आहे. या स्पर्धेला 50 दिवसांचा कालावधी राहिला असल्याने आयसीसीने या अँथमचा टीझर शुक्रवारी (दि.12) प्रक्षेपीत केला.
2 जूनपासून कॅरेबियन बेट (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत सुरू होणार्या या टी-20 वर्ल्डकपच्या अँथमचे निर्माचा मायकल ‘टॅनो’ मोटँनो आहे. या अँथममध्ये अनेक सुपरस्टार असणार आहेत, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. दरम्यान, या अँथममध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेता सीन पॉलही दिसणार असून त्याच्यासह केस डायफेन्थॉलरही गाणार आहे. डायफेन्थॉलर जगभरात केस म्हणून ओळखला जातो, तो त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील केस द बँडचा प्रमुख गायक आहे. या अँथममध्ये कॅरेबियन ताल आणि आंतरराष्ट्रीय ढंग असे मिश्रण पाहायला मिळणार आहे.