| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तैपेई संघाची ताय झु यिंग हिने यंदाच्य मोसमातील सलग दुसऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिंगापूरच्या येओ जिया मिन हिचा सरळ गेमध्ये पराभव करुन ताय झु यिंगने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत माजी अव्वल मानांकित असलेल्या ताय हिने काह दिवसांपूर्वी झालेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत अंतिम सामन्यात दुखापतीमुळे माघार घेतली त्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता झालेल्या उपांत्य सामन्यात ताय हिने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या जिया मिन हिचा 21-13, 21-18 असा पराभव केला. अंतिम सामन्यात ताय हिचा सामना ऑलिंपिकविजेती चेन यु फेई आणि इंग झाई यी यांच्यातील विजेत्याशी होईल.