| नागपूर | दिलीप जाधव |
पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि त्यांच्या नातेवाईकांनी सिड़कोच्या 5 एकर भूखंडावर केलेले अतिक्रमण किती दिवसात काढणार, असा संतप्त सवाल आ.जयंत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, या अनधिकृत बांधकामाबाबत मी चौथ्यांदा सभागृहाचे लक्ष वेधत आहे. माजी उपमहापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तसेच अधिकार्यांवर दड़पशाही करून पनवेल येथील मौजे रोडपाली येथील बौद्धवाड़ी सेक्टर -18 कळंबोली येथील सिड़कोच्या अखत्यारितील असलेल्या 5 एकर भूखंडावर अनधिकृतपने व्यवसायिक चाळ, बहुमजली इमारत व मोठे पार्किंग, मोेबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. सिड़कोच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत या बांधकामाची पाहणी करून सिड़को कायद्या अंतर्गत नोटिस बजावण्यात आली आहे. मात्र हे अतिक्रमण अद्याप निष्काषित केले नाही. ते सिड़को कधी करणार, असा संतप्त सवाल जयंत पाटिल यांनी केला.
यावर सरकार तर्फे मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, सदरचे अनधिकृत बांधकाम पाडण्याकरीता 16 डिसेंबर रोजी जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्या जागेवर 21 अनधिकृत बांधकामे नक्की करण्यात आली आहे. 30 डिसेंबर रोजी हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी कळंबोली पोलिस ठाणे यांना पोलीस बंदोबस्तासाठी कळविण्यात आले आहे. या कारवाईत पनवेल महानगरपालिका सहभागी होणार आहे. तसेच राज्य शासनाच्या गृह विभागाला कळविण्यात आले आहे, असे सुचित केले.